Back to prayer library

Yuge Atthavis Vitevari Ubha

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा

5 min · Verified aarti
Text 1
Verse 11 of 6

Verse 1

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥

Refrain

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ॥ ध्रु० ॥

Verse 2

तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी ।

कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।

देव सुरवर नित्य येती भेटी ।

गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥ २ ॥

Verse 3

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।

राही रखुमाबाई राणीया सकळा ।

ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥ ३ ॥

Verse 4

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।

दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ ४ ॥

Verse 5

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।

चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती ।

दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती ।

केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥ ५ ॥

गणपती बाप्पा मोरया

Prayer complete

Lyrics reviewed by Tap1ce content review. Made freely available by Tap1ce.