Verse 11 of 5
Verse 1
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
Refrain
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ ध्रु० ॥
Verse 2
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळेल ही मात ।
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ २ ॥
Verse 3
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ ३ ॥
Verse 4
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ।
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
गणपती बाप्पा मोरया
