Refrain1 of 5
Refrain
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ॥ ध्रु० ॥
Verse 1
आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥
Verse 2
पिवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ २ ॥
Verse 3
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी ॥ ३ ॥
Verse 4
असो नसो भाव आम्हां तुझिया ठाया ।
कृपादृष्टी पाहे माझ्या पंढरीराया ॥ ४ ॥
गणपती बाप्पा मोरया
