Back to prayer library

Aarti Dnyanraja

आरती ज्ञानराजा

3 min · Verified aarti
Text 1
Refrain1 of 4

Refrain

आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।

सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥

Verse 1

लोपले ज्ञान जगी । हित नेणती कोणी ।

अवतार पांडुरंग । नाम ठेविले ज्ञानी ॥ १ ॥

Verse 2

कनकाचे ताट करी । उभ्या गोपिका नारी ।

नारद तुंबरु हो । साम गायन करी ॥ २ ॥

Verse 3

प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्मची केले ।

रामा जनार्दनी । पायी मस्तक ठेविले ॥ ३ ॥

गणपती बाप्पा मोरया

Prayer complete

Lyrics reviewed by Tap1ce content review. Made freely available by Tap1ce.