Back to prayer library

Aarti Tukarama

आरती तुकारामा

2 min · Verified aarti
Text 1
Refrain1 of 3

Refrain

आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ।

सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ ध्रु० ॥

Verse 1

राघवे सागरात । पाषाण तारिले ।

तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिले ॥ १ ॥

Verse 2

तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आले ।

म्हणोनि रामेश्वरे । चरणी मस्तक ठेविले ॥ २ ॥

गणपती बाप्पा मोरया

Prayer complete

Lyrics reviewed by Tap1ce content review. Made freely available by Tap1ce.