Back to Ganesh Aartis

Sukhkarta Dukhharta

सुखकर्ता दुःखहर्ता

7 min · Verified aarti
Text 1
Stanza 11 of 14

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ ध्रु० ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।

हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥ २ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ ध्रु० ॥

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।

सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।

नागबंद सोंड-दोंद मिराविले ।

विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ ३ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ ध्रु० ॥

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।

खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।

सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।

अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ ४ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ ध्रु० ॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।

उंदीराचे वाहन तुजला गणपती ।

ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।

आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ ५ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ ध्रु० ॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।

ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।

ताल मृदंग वीणा घोर उमटती ।

त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ ६ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ ध्रु० ॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ ध्रु० ॥

गणपती बाप्पा मोरया

Prayer complete

Lyrics reviewed by Tap1ce content review. Made freely available by Tap1ce.