Back to prayer library

Satrane Uddane Hunkar Vadani

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी

3 min · Verified aarti
Text 1
Verse 11 of 3

Verse 1

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।

करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।

कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी ।

सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥

Refrain

जय देव जय देव जय श्रीहनुमंता ।

तुमचेनी प्रसादे न भी कृतांता ॥ ध्रु० ॥

Verse 2

दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द ।

थरथरला धरणीधर मानिला खेद ।

कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।

रामी रामदासा शक्तीचा शोध ॥ २ ॥

गणपती बाप्पा मोरया

Prayer complete

Lyrics reviewed by Tap1ce content review. Made freely available by Tap1ce.